
प्रेम केलं कि अंसच होणार....
सहवास कमी दुरावा जास्त मिळणार
नको त्या गोष्टीत अडकून...
डोक्याला नेहमी त्रास होणार
घरच्या नजरेतून वाचून...
समाजाच्या नजरेत नेहमी सापडणार
सुखाच्या शोधात जाताना...
दुःखाच्या जंगलात अडकणार
स्वप्नाच्या नव-नविन दुनियेत भटकताना...
झोप मोडणारे अनेक लोक येणार
प्रेम केलं कि अंसच होणार...
जवळ असून मन दूर होणार
भावनाना साक्ष ठेऊन घेतलेल्या...
शपथी, नेहमीच अधु-या राहणार
भावनाचा उद्रेक होऊन...
हाती मोठी चुक लागणार
मरणापरी आठवेल शब्द हे
प्रेम केलं कि अंसच होणार...!
- मयुर वाकचौरे

No comments:
Post a Comment