Monday, November 12, 2007

याला परेम म्हणता व्हयं.....!



वळख व्हवून निट चार दिस झालं नाय
अन ह्या पोरान्ची झोप उडाली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....
ति दोघं एकमेकाकडे बघुन नुसती हसली काय
अन हि पोरं स्वप्न पाहु लागली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....
एक दिस बाहेर फ़िरायला गेली काय
अन हि पोरं कालेज बुडू लागली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....
एकमेकाच्या मिठित बसुन चार शपथी घेतल्या काय
अन हि पोरं आई-बापाला दुमाजू लागली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....
कुनाचं मन नाय दुखवायचं बुवा मला
पण ऊगाच मनात आलय म्हणून लिहिलयं
अन काय बुवा...,
तुम्हाला एव्हडं राग यायचं कारण काय...?

- मयुर वाकचौरे

No comments: