Saturday, November 24, 2007

मला उत्तर कोण देणार...?



भरारी उडू पाहतं मन हे
पण भावनाना सिमा कोण आखणार...?

वाट दुर जाते ही
पण वाटेत साथ कोण देणार...?


स्वप्न तर खुप पहायची आहे
पण त्याआधी सुखाने झोपुन कोण देणार...?

प्रश्न तर खुप आहेत
पण सर्वाची उत्तरे कुठे मिळणार...?

शत्रु तर खुप आहे वाटेत
पण मित्र कधी मिळणार...?

मिळालेल्या सुदंर जिवनाला
अजून सुदंर कसं बनवणार...?

पडलेल्या ह्या सर्व प्रश्नाचे
मला उत्तर कोण देणार...?


- मयुर वाकचौरे

प्रेम केलं कि अंसच होणार....!




प्रेम केलं कि अंसच होणार....
सहवास कमी दुरावा जास्त मिळणार

नको त्या गोष्टीत अडकून...
डोक्याला नेहमी त्रास होणार

घरच्या नजरेतून वाचून...
समाजाच्या नजरेत नेहमी सापडणार

सुखाच्या शोधात जाताना...
दुःखाच्या जंगलात अडकणार

स्वप्नाच्या नव-नविन दुनियेत भटकताना...
झोप मोडणारे अनेक लोक येणार

प्रेम केलं कि अंसच होणार...
जवळ असून मन दूर होणार

भावनाना साक्ष ठेऊन घेतलेल्या...
शपथी, नेहमीच अधु-या राहणार

भावनाचा उद्रेक होऊन...
हाती मोठी चुक लागणार

मरणापरी आठवेल शब्द हे
प्रेम केलं कि अंसच होणार...!

- मयुर वाकचौरे

Monday, November 12, 2007

याला परेम म्हणता व्हयं.....!



वळख व्हवून निट चार दिस झालं नाय
अन ह्या पोरान्ची झोप उडाली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....
ति दोघं एकमेकाकडे बघुन नुसती हसली काय
अन हि पोरं स्वप्न पाहु लागली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....
एक दिस बाहेर फ़िरायला गेली काय
अन हि पोरं कालेज बुडू लागली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....
एकमेकाच्या मिठित बसुन चार शपथी घेतल्या काय
अन हि पोरं आई-बापाला दुमाजू लागली
अन काय बुवा...,
तुम्ही याला परेम म्हणता व्हयं.....
कुनाचं मन नाय दुखवायचं बुवा मला
पण ऊगाच मनात आलय म्हणून लिहिलयं
अन काय बुवा...,
तुम्हाला एव्हडं राग यायचं कारण काय...?

- मयुर वाकचौरे

Tuesday, November 6, 2007

तु फ़क्त हो म्हण....!



तु फ़क्त हो म्हण....
चंद्रालाही तुझ्या जवळ आणेन मी
याचा अर्थ असा होत नाही की,
तो खरा असेल......?

तु फ़क्त हो म्हण....
दिवस-रात्र एक करेल मी
याचा अर्थ असा होत नाही की,
२४-तास तुझ्याजवळ बसेल मी......?

तु फ़क्त हो म्हण....
तुझ्यासाठी वाटेल ते करेल मी
याचा अर्थ असा होत नाही की,
माझ्या अनमोल जिवनाची आहुती देइल मी....?

तु फ़क्त हो म्हण....
तुझी सर्व स्वप्ण पूर्न करेल मी
याचा अर्थ असा होत नाही की,
तूला सुखाने झोपुन देइल मी.....?

तु फ़क्त हो म्हण....
गुलाबाच्या पाकळी पेक्शाही जास्त जपेल तुला मी
याचा अर्थ असा होत नाही की,
तुला एखाद्या जुन्या पुस्तकात ठेवेल मी.....?

तु फ़क्त हो म्हण....
सर्व जगला एकत्र करेल मी
याचा अर्थ असा होत नाही की,
भारत-पाक प्रश्न सोडवेल मी.....?
- मयुर वाकचौरे