Saturday, October 6, 2007

मी कुठे कविता करतो...!


कोण म्हणतं कि मी कविता करतो
मी तर फ़क्त सत्य कथन करतो
आलेल्या खट्याळ वारयाला दिशा देतो
आणि त्यामगे जाण्याचा प्रयंत्न करतो.
मी कुठे कविता करतो
मी तर फ़क्त शब्दाशी खेळतो
शब्दाचे भाव कळत नसले तरी
ते फ़क्त जोडण्याचं काम मी करतो
मी कुठे कवि सारखा विचार करतो
मी फ़क्त कविता वाचतो
समजत नसली तरी, त्यामधील सत्त्याला
शोधण्याचा लपंडाव मी खेळतो
शब्दाच्या या अश्याच खेळात
सुचते आशिच एक ओळ
तिच फ़क्त कगदावर उतरवतो
आणि सर्व म्हणतात कि मी कविता करतो
नेहमीच लिहिताना होती एखादी चुक
कविता करण्याइतपत मोठा नाही मी
शब्द भंडारातला फ़क्त एक
चोटासा खट्याळ शब्द आहे मी

- मयुर वाकचौरे

1 comment:

Satish said...

Mitra,

Kavita aavadlee!

Keep writing,