
मलाही वाटलं प्रेम करावं,
म्हणुन मी प्रेम केलं.
आता मला सागा प्रेम मी केलं,
मग तिचं काय गेलं.
मलाही वाटलं स्वंप्ण पहावीत,
म्हणुन मी स्वंप्ण पाहिली.
आता मला सागा स्वंप्ण मी पाहिलीत,
मग तिचं काय गेलं.
मलाही वाटलं मी आनंदी रहावं,
म्हणुन मी आनंदी राहू लागलो.
आता मला सागा आनंदी मी राहू लागलो,
मग तिच काय गेलं.
मलाही वाटलं कि मी कविता करावी,
म्हणुन मी कविता केली.
आता मला सागा कविता मी केली,
मग तिचं काय गेलं.
मलाही वाटलं कि खूप झालं आता,
म्हणून मी "sorry" म्हणालो.
आता मला सागा "sorry" मी म्हणालो,
मग तिचं काय गेलं.
- मयुर वाकचौरे

No comments:
Post a Comment