Saturday, November 13, 2010

सागं रे मना......

सागं रे मना......(Part I)


सागं रे मना......
हवं काय तुला
नुकतचं उमललेलं फ़ूल,
काहीतरी सागतंय मला....

सागं रे मना......
ओढ तुला कुणाची
पोर्णीमेच्या रात्री,
वाट जशी पाहतो मी चंद्राची.....

सागं रे मना......
सुगंध हा कसला
आज " असं " मला पाहून,
माझाच आरसा मला हसला.....

सागं रे मना......
गोड हे हसू कुणासाठी
जसं लहान मुल रडत असतं,
आपल्या आईसाठी.......

सागं रे मना......
झोप तुझी कशी उडाली
जशी नविन नवरी,
पाहण्याआगोधर लाजली......

To be continue


- मयूर वाकचौरे

No comments: