
Please help the poor Farmer in INDIA.....
If u could do something for them then i would
think that my poem got the meaning.....
मातीचं लेकरू
मातीचं लेकरू, मातीत जन्मलं
मातीत वाढून, मातीतच खेळू लागलं
मातीला नवं अस्तित्व देऊन,
मातीतच पोट भरू लागलं......
ठाव नव्हती या लेकराला,
तडा पडेल उभ्या आयुष्याला
गुन्हा फक्त एकच केला,
माती माय समजून, मातीतच जगत राहिला.
न हाव होती पैशाची,
न हाव होती मोठं व्हायची
इच्छा फक्त एवढेची होती ......
सोनं करून मातीचं, सगळ्यांची भूक भागवायची होती.
उभ आयुष्य मातीत झटत राहिला
तहान, भूक, घराला विसरून
उन्हात मर, मर, मरत राहिला
मातीचं लेकरू,
मातीतच पोट भरू लागलं......
हट्ट काय रे या लेकराचा
भूक काय रे या लेकराची
समजू नाही शकलो आपण कधी
जीवन गाथा या मातीच्या लेकराची....
- मयुर वाकचौरे

No comments:
Post a Comment