
Corruption (The truth...... )
जन्मताच " श्वास " पहिला घेतला
त्याच वेळेस " Corruption " चा सुगंध तेथे आढळला
छोट्या पाळण्यात ठेवण्याआधीच ,
डॉक्टरांनी " बाबांकडे " बंडल नोटांचा मागितला.......
थोड्या दिवसात शाळा शिकण्याची लागली ओढ
शाळेत गेल्यावर मात्र,
तेथे दिसला " No Vacancy " चा बोर्ड.
आता कुठे कळणार होती,
शिक्षणाची किंमत
पैसे पाहताच, " Principal " झाले,
"Admission " ला सहमत .....
तेव्हा कुठे माहित होतं,
शिक्षणालाही लागते पैशांची हुकुमत.....
रोज घरून ज्ञान घेण्यासाठी निघत होतो,
शाळेत येऊन मात्र,
उघड्या पडलेल्या शिक्षणाच्या बाजारात मी फिरत होतो.......
बाबांनी कष्टाने बांधलेलं घर,
" Munciparty " च्या हद्दीत आलं होतं
" Corupted " सरकारचं " बुलडोझर ",
बाबांच्या आता छातीवरच पडणार होतं.........
मतदानाच्या काळात, दिवसभर आश्वासनं देत फिरणारी नेते,
हात जोडून आशीर्वाद मागत होती,
रोज रात्री मात्र,
तीच हात पैशाने माखत होती.
बेरोजगाराला काम देण्याचे आश्वासन देऊन,
खुर्चीवर हि लोक आरामात बसत असतात...
उपाशी झोपतोय गरीब इकडे,
तिकडे मात्र,
रोज रात्री पार्टी थाटात होत राहतात......
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणारी सरकार
शेतकऱ्यांनीच पिकवलेल्या अन्नावर " Polytics " खेळत आहे
स्वतःचा शेतीप्रधान देश, असे म्हणून
आपल्याच काळ्या मातीचा अपमान करत आहे .......
अन्न पिकवून अखेर शेतकऱ्याचा श्वास सुटला
त्यातही सरकारचं " Corruption " मिटलं नाही,
पैशांपुढे सरकारचं हात पसरवणं,
कधीच संपणार नाही.......
- मयुर वाकचौरे


