Wednesday, March 26, 2008

कोण म्हणत देव नसतो......!

कोण म्हणत देव नसतो......!



कोण म्हणत देव नसतो
आधार मागितला चालण्यासाठी,
आई-वडिल दिलेत...
जग बघण्यासाठी.

थोड पुढ चालून
प्रवास काटावा म्हटल,
तर मित्र दिलेत
आधारसाठी.....

आल्या जन्मी काही करावस वाटल
जग बघण्यासठी,
गुरु दिलेत....
ज्ञान वाढवण्यासाठी.

कोण म्हणत देव नसतो....

सहवास हवा होता
सुख:दुखाची देवाण-घेवाणासाठी
जीवनाचा जोडीदार दिलास....
भरुन आलेल मन मोकळ करण्यासठी.

सगळ मिळाल्यावर आता मात्र
आभार मानावस वाटल
जन्मदाताच तो.....
शेवटी त्यान त्याच्याच दारात आणुन टाकल

-मयुर वाकचौरे
21-11-09 5:15pm

Monday, February 25, 2008

पण का कुणास ठाऊक...





का कुणास ठाऊक ...?
तुझ्या बोलण्याचा मला राग आहे
पण का कुणास ठाऊक,
नेहमीच तुझ्याशी बोलावासं वाटतं....
तुझ्या सवयीचा मला राग आहे
पण का कुणास ठाऊक,
सगळं काही तुला सागावसं वाटतं....
तुझ्या हसण्याचा मला राग आहे
पण का कुणास ठाऊक,
नेहमीच तु हसावसं वाटतं....
तुझ्या आठवणीचा मला राग आहे
पण का कुणास ठाऊक,
तुझ्या आठवणीतच रहावसं वाटतं....
तुझ्या "miss call"चा मला राग आहे
पण का कुणास ठाऊक,
तरीही तुला फ़ोन करावासा वाटतो....
का कुणास ठाऊक...?
तुझी आठवण येताच,
डोळ्यात अलगद पाणी येते.....,
का कुणास ठाऊक...?
डोळे अलगद मिटताच,
तु नेहमीच समोर दिसतेस....,
का कुणास ठाऊक...?
थंड हवेची झुळूक येताच,
तु आल्याचा भास होतो...,
का कुणास ठाऊक...?
श्वास घेताच रुधयाचे ठोके,
तुझ्या नावाने पडू लागतात...,
पण का कुणास ठाऊक...?
मला तुझा एव्हढा राग का आहे...?
मला तुझा एव्हढा राग का आहे...?

-मयुर वाकचौरे

म्हणून काय झालं...

प्रिये, आज मी तुझ्या सोबत आहे
म्हणून काय झालं,
दुसरं कोणी मला भेटलच नाही.....

प्रिये
,आज मी तुझ्यासाठी गुलाबाचं फ़ुल आणलय
म्हणून काय झालं,
फ़ुलाचा गुछा मला भेटलाच नाही.....

प्रिये, आज आपण झाडाखालीच बसुया
म्हणून काय झालं,
"Hotel" मधे जायल खिशात पैसेच नाही.....

प्रिये, आज तु खूप सुदंर दिसत आहेस
म्हणून काय झालं,
मला कधी खरं बोलताच येत नाही.....

प्रिये, आज मी......
बस खुप झालं आता.
म्हणून काय झालं,
आज तर मी "बकवास डे" सेलीब्रेट करत होतो.....

-मयुर वाकचौरे

Saturday, February 2, 2008

निशब्द...


निशब्द...
शब्दाच्या या खेळात
डाव माडंला मी मनाचा
सागंत राहिलो शब्दातुनी तूला
भाव या प्रितीचा...!
कधी न कळली प्रित तूला
माझ्या खट्याळ शब्दाची
स्वप्ण फ़क्त एव्हढेची होते
प्रित असू दे कोवळ्या मनाची...!
शब्दातही तूला पाहत होतो
पाहून शब्दातच तूला माडंत होतो
खेळूनी खेळ शब्दाचा
पुन: शब्दातच मी राहत होतो...!
शब्दाच्या या कोड्यात
एक घरटं बाधून पाहीलं मी
घरटं बाधल्यावर मात्र
शब्दातुनीच दुर जाताना तुला पाहिलं...!
शब्दातुनी दुर गेल्यापरी तू
आज निशब्द होऊनी बसलो
तुझ्या पाठमो-या शरीराकडे बघून
मीच माझ्या शब्दातुनी हसलो...!
तू गेल्यावर आता उरला
तो फक्त ...
निशब्द.. निशब्द.. आणि निशब्द..
-मयुर वाकचौरे

Wednesday, January 16, 2008

आता तुला सगळं जुनं...?

आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं तुझ्या
गालावर पडणारी खळी...
तुला मात्र तुझं हसणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं तुझे
ते तिखट अश्रू...
तुला मात्र तुझं रडणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं आपण
एकदा पावसात भिजलो होतो...
तुला मात्र तो पाऊस
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?





मला आठवतं दिलं होतं
गुलाबाचं फ़ुल...
तुला मात्र त्याचा रंग
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं तु
एकदा रुसली होतीस...
तुला मात्र माझं रागवणं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

मला आठवतं आपण
खुप भाडायचो...
तुला मात्र माझं भाडंण
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

आता तुला सगळं जुनं
आठवेल की नाही कुणास ठाऊक...?

-मयुर वाकचौरे