Friday, December 14, 2007

जिवनाची गाडी तुझी...!



मन सोडुनी आज आलो
स्वछंदी बागेत रमलो
बसलो कितीही एकटा
शब्दाविना हा खोटा


प्रवासी म्हणून प्रवास करत होतो
धावत्या गाडीबरोबर जाण्याचा,
प्रयत्न करत होतो
इतक्यात मग आवाज येतो


न ठाव या मनाची
रमत उडना-या पाखराची
उगीच बघत बसलो
विनाकारण तिच्यात फ़सलो

नजर तिची ती काटेरी
मज काळजाला ठोकरी
तरी पाहण्याची हुरहुर मानावी
ह्रुदयाच्या बिट ती वाढवी

मन माझे हे कोवळे
जसे नित्य-नियम पाळे
उगाच चेष्टा माझी करुनी
मन माझे कानी म्हणी

अरे वेड्या,
समोर असतना पाहत रहा
निघूनी गेल्यावर चालत रहा
जिवनाची गाडी तुझी,
आली तशी चालवत रहा.
- मयुर वाकचौरे