
Date :- 14 Aug 2007
माझा मी पणा...!
सगळ काही हरवुन बसलो,
मझ्या ह्या मी पणात
कोठुन आला हा "मी" पणा माझ्यात
आजही उत्तर शोधतोय मझ्या मनात
नेहमीच मी असा, मी तसा
जेव्हढे काही कमावले ते
गमावून बसलो मी, मझ्या ह्या "मी" पणात
कोठुन आला हा "मी" पणा माझ्यात
स्वार्थी भावना आली कोठुन माझ्यात
का कधिच कळाले नाही मला,
सगळेच काही घेऊन गेली,
देऊन मात्र फ़क्त दु:ख गेली
वाहणारा वारा खट्याळ असतो
का नाही समजू शकलो त्या खट्याळ वाराला
नेहमीच खुप काही सागायचा
पण वेळच नसायचा समजुन घ्यायला
"माझ्या ह्या मी पणात"
- मयुर वाकचौरे

No comments:
Post a Comment